परवा संध्याकाळी मी आणि मैत्रिणीने ठरवलं की पहाटे उठून साखी गोपाळ पर्यंत जाऊन यायचं. साखी गोपाळ म्हणजे खरंतर साक्षी गोपाळ असं आपण म्हणू शकतो. या मंदिराला सत्यवादी गोपीनाथ मंदिर असंही संबोधलं जातं.

सकाळीच उठून सव्वासहाच्या दरम्यान आम्ही निघालो. थंडीची नुकतीच सुरुवात होत होती. छान गारठा पसरला होता.